fbpx

काँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. आज सांगली येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची सभा पार पडली. भारतीय जनता पक्षात जोवर जीव आहे तोवर काश्मीरला भारतापासून कुणीही वेगळं करू शकणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर एअर स्ट्राईकच्या पुराव्यांवरून अमित शाह यांनी कॉंग्रेसला चांगलेचं लक्ष केले.

अमित शाह सांगलीत संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसवाले काश्मीरला भारतापासून तोडायची भाषा करत आहेत, देशात दोन पंतप्रधान करण्याची मागणी करत आहेत. घुसखोरांचं समर्थन देखील काँग्रेसवाले करत आहेत. असे शाह यावेळी म्हणाले.

तर ते पुढे म्हणाले की, पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही देशात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून मारू असे सांगत दहशतवादाप्रती भाजपचा झिरो टॉलरन्स असल्याचेही ते म्हणाले.