‘भाडे के टट्टू  चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र

टीम महाराष्ट्र देशा : लोक सांगतात राहूल गांधींची पॉवर वाढली आहे. पण ‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आज राज्यातील भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पुण्यामध्ये पार पडला यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र दिला आहे. यावेळी बोलताना शहा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील निशाणा साधला, तसेच विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर देण्याची सूचना केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी दिली.

मला माहित आहे माझ्याकडे चेतक घोडे आहेत ज्यांना भाड्यांच्या टट्टूपासून कोणताही धोका नाही. आपण मोठ्या प्लॅनिंगने काम करण्याची गरज आहे. तुमच्या डोक्यामध्ये असणारी निराशा काढून टाका, कारण आपलं सरकार नेहमी चांगलंच असतं. मागील चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं कोणतंही काम केलं नाही ज्यामुळे लोकांना मान खाली घालावी लागेल. राहुल गांधींना जनताच मानत नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही. असा घणाघात अमित शहा यांनी राहुल गांधीवर केल्याचं कळतंय.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजप सोशल मीडिया टीमचा असणारा सहभाग सध्या कमी प्रमाणात दिसत आहे. आता शहा यांनी सर्व कार्यकर्त्यांना नव्याने ऊर्जा दिल्याने येत्या काळात महाराष्ट्र आणि देशातील सोशल मीडिया टीम सक्रिय झाल्याचं दिसू शकत.

You might also like
Comments
Loading...