fbpx

शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात ! – अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात ते बोलत होते.

राहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे अशी टीका सुद्धा अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.