राहुल गांधींना बटाटे जमिनीच्या खाली येतो की वर हेच कळत ; शहांचा घणाघात

पुणे : मी पुण्यामध्ये येऊन शरद पवारांना विचारतो की तुमच्या सरकारमधल्या कृषीमालाची आकडेवारी जाहीर करा, आम्ही आमची सांगतो. राहुल गांधी शेतकऱ्यांची गोष्ट बोलतात पण त्यांना बटाटा जमिनीच्या खाली येतो की वर हे कळत नसल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील भ्रष्ट्राचार संपवण्यात काम सत्ताकाळात केलं आहे. तसेच अजित पवारांनी काय विधान केले होते हे जनता विसरलेली नाही. महाराष्ट्राला खाली आणण्याचं काम काँग्रेस आणि शरद पवारांच्या पार्टीने केलं केल्याची टीका शहा यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आज शक्तिकेंद्र प्रमुख, बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, खा. अमर साबळे यांच्यासह आमदार, पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

महागठबंधन वगैरे काही नाही, उत्तर प्रदेश सोडता कोणतीही नवीन आघाडी झालेली नाही. मी उत्तर प्रदेशच्या सर्व भागाला ओळखतो. त्यामुळे 72 च्या 74 जागा होतील एकही जागा कमी होणार नाही, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

देश आणि जनतेसाठी आपण आगामी निवडणूक जिंकणे गरजेचं आहे. देशाचे जेवढे राजकीय पक्ष चालतात, त्या सर्वात भाजप वेगळा आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांची आहे ना की नेत्यांची. 2014 नंतर आपण आजवर कधीही न जिंकलेल्या ठिकाणी विजय मिळवला आहे. बूथ रचना आणि तिथे काम करणारा कार्यकर्ता हे पक्षाच्या विजयाचं कारण असल्याचं शहा म्हणाले.

2014 नंतर परिवार जातीवाद करणाऱ्या लोकांचे राजकारण आम्ही संपवले. 2014 ते 2019 दरम्यान जातीवादा सारख्या गोष्टी संपवल्या. 2019 मध्ये ठगबंधन जिंकल्यास देश पुन्हा परिवार वादाकडे जाईल. 55 वर्षे राहुल बाबा आणि कंपनीने देशावर राज्य केले. पण देशात बदल झाला नाही. परंतु मागील 55 महिन्यात पंतप्रधान मोदींनी बदल करून दखवला. देशाच्या आशा प्रत्येक घटकाला न्याय देणारे बजेट मोदींनी दिल्याचा दावा शहा यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा नारा दिला आहे. ते म्हणाले.

रावसाहेब दानवे यांनी 2014 पेक्षा एक जागा जास्त म्हणजे 43 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ही 1 जागा बारामतीची असेल म्हणत, आता बारामती जिंकायचीच. मागील निवडणुकीत बारामती लोकसभेत कमळ चिन्ह असते तर काय चित्र असते हे सर्वांना माहीत आहे. यावेळी कमळ चिन्ह घेऊनच लढले जाईल, असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, आज सर्व विरोधक भाजपला हरवण्यासाठी एकत्र येत आहेत, मात्र या सर्वांना पुन्हा एकदा मोदी सत्तेत आल्यास पुढील 50 वर्षे आपल्याला सत्ता मिळवता येणार नाही ही भीती आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन पंतप्रधान होण्यासाठी दिल्लीकडे जायला निघाले आहेत. परंतु यांचा नारा हा आवो चोरो बांदो भारा, आधा तुम्हाला आधा हमारा, अशी आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा