परिवारातून येणारे नाही तर कर्तृत्वाने येणारे नेतृत्व देशाचा विकास घडवते : अमित शहा

पुणे : परिवारवादावर चाणक्यांनी सर्वप्रथम प्रहार केला होता. परिवारातून येणारे नाही तर कर्तृत्वाने येणारे नेतृत्व देशाचा विकास घडवते सांगत जो जेष्ठ असेल तो श्रेष्ठ असेल असं नाही तर श्रेष्ठ असेल तोच जेष्ठ असल्याचं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ते पुण्यामध्ये आयोजित 12 व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान प्रसंगी बोलत होते.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित 12 व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.अनिरुद्ध देशपांडे, खा.विनय सहस्त्रबुद्धे, आ.मंगलप्रभात लोढा, रेखा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.