fbpx

युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरे यांना फोन !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गेले काही दिवस शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता थेट भाजप अध्यक्ष अमित शहा  यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून युतीबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युती होणार कि काय अशी चर्चा रंगली आहे.

जर भाजप शिवसेना स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा आघाडीला म्हणजेच कॉंग्रेस – राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजप एकत्र लढावे यासाठी अनेक सेना – भाजप नेते युती करीता धडपड करत आहेत. पण आता तर खुद्द  भाजप अध्यक्ष अमित शहा  यांनी लवचिक भूमिका स्वीकारून  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचीत केली आहे.त्यामुळे स्वबळाची भाषा करण्याऱ्या शिवसेनेनेही आपली भूमिका मवाळ केल्याच दिसत आहे. या चर्चेवेळी अमित शहा यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती मिळत आहे.