विधानसभा निवडणूकीसंदर्भात भाजप मुख्यालयात शहांनी बोलावली बैठक

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत महाराष्ट्रात भाजप निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरी जाणार याची रणनीती आखली जाणार आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीबाबत देखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. युतीच्या जागावाटप कशापद्धतीने होणार यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

काही दिवसातचं राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व खाली महाजानादेश यात्रा काढली आहे. तसेच दिल्लीच्या भाजप मुख्यालयात देखील गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकी बोलावली आहे. महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, तसेच हरियाणा आणि झारखंड राज्यातील निवडणूक प्रभारी बैठकीला उपस्थित आहेत.

Loading...

दरम्यान लोकसभे प्रमाणे विधानसभेला ही भाजप आणि शिवसेना हे युती करून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र अजूनही सेना भाजप युतीवर काही भाजप नेत्यांकडून प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. कारण लोकसभेच्या आलेल्या निकालावरून भाजपने स्वबळाचा नारा दिला तरी सत्तेवर येण्याची खात्री काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीत मिठाचा खडा पडणार असल्याची शक्यता भाजपच्या काही नेत्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आज अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीत युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट