मुंबई : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. बुधवारी ते चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार होते, तिथे ते भाजपच्या हायकमांडला भेटणार होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द झाला. यामागचे कारण त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार असल्याची शक्यता आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दिल्ली दौरे वाढल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे ५ वेळा दिल्लीला गेले. मात्र शहा आणि शिंदे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली नाही. काल (बुधवार) एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते. मात्र वेळेवर त्यांचा दौरा रद्द झाला. आज रात्री ते दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सरकारचे रिमोट दिल्लीत असल्याचे स्पष्ट होते.
शिंदे गटाकडे ५० ते ५२ आमदार आहेत तर भाजपकडे अपक्ष आमदारांसह ११५ आमदार आहेत. त्यामुळे कुणाला मंत्रीपदे द्यायची यावरुन चांगलाच गोंधळ सुरु आहे. भाजपमधील मंत्रिपदाबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे गटातील मंत्रिपदाबाबत चर्चा रखडली आहे. तसेच मुळ शिवसेनेने शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाच आव्हान दिले आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या मनात धाकधूक वाढली आहे.
अनेक आमदार मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिपदावरुन चांगलेच नाराजी नाट्य रंगणार आहे. भाजपने सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात घेतल्याने. शिंदे गटात नाराजी उमटणार असल्याची चर्चा आहे. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल” ; संजय राऊतांचे मोठे विधान
- Amol Mitkari | शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही – अमोल मिटकरी
- Sanjay Raut : पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको – संजय राऊत
- Suraj Vashishth | युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रचला इतिहास; 32 वर्षांनंतर जिंकले गोल्ड मेडल
- Aurangabad : भाजपा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत; औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत युती!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<