२२ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत, विधानसभेसाठी युतीवर शिक्कामोर्तब होणार ?

blank

टीम महाराष्ट्र देशा: भाजप अध्यक्ष अमित शहा हे २२ सप्टेंबरला मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी युती संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु असताना शहा – ठाकरे यांच्या भेटीमध्ये युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत देखील अमित शहा, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर युती ठरली होती.

विधानसभा निवडणूकीसाठी भाजप – शिवसेनेत युती होणार कि नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून फिफ्टी – फिफ्टीचा फॉर्म्युल्यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. तर भाजप मात्र एवढ्या जागा सोडण्यास तयार नाही. जागा वाटपावरून तणाव सुरु असला तरी दोन्ही पक्षाचे नेते युती होणारचं, असं सांगत आहेत.

शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असं म्हंटल आहे, खासदार संजय राऊत यांनी देखील रावते यांच्या विधानाचे समर्थन केलं आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी युतीबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनाच असल्याचं सांगितल आहे.

दरम्यान, युतीची बोलणी सकारात्मक सुरु असल्याचं सांगितले आहे. भाजपचे विद्यमान १२२ आमदार आहेत, यामध्ये बाहेरून आलेले मिळून हि संख्या १३६ वर जाते. काही ठिकाणी मागील ओंच वर्षात आम्ही चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे युतीमध्ये आम्हाला जास्त जागा लागणार असल्याने उद्धवजी आमची ओढाताण समजून घेतली, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.