अमित शहा १०० टक्के उद्धव ठाकरेंची भेट घेणार -भाजप

मुंबई: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. मात्र अमित शाहांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये ‘मातोश्री’वरील भेटीचा उल्लेखच त्यामुळे ठाकरे आणि शहा भेटणार ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र शहा १०० टक्के ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी स्पष्ट केले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार म्हणून भाजपाने चांगलीच उत्सुकता शिगेला पोहचवली. मात्र आज शहा ठाकरे यांची भेट अजून संभ्रमात आहे.

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेला मनवायाचे कामे सुरु आहेत. आज अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजप आणि अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यामुळे ही भेट रद्द तर झाली नाही ना असा प्रश्न पडला आहे.