fbpx

अमित शहा आज घेणार पुणे, बारामती लोकसभेचा आढावा

पुणे: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकिसाठी आज भाजपाध्यक्ष अमित शहा हे पुण्यामध्ये आहेत शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील पुण्यातील गणेश क्रीडा कला मंचामध्ये हा कार्यक्रम होणार असून अमित शहा हे कार्यकर्ता नेमका काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी असणाऱ्या भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. स्वतः अमित शहा हे अनेक ठिकाणी बैठक घेणार आहेत. पुण्यामध्ये होणारी बैठक ही सध्या भाजपकडे असणाऱ्या पुणे लोकसभा तसेच राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघासाठी होत आहे.