येणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा

नवी दिल्ली: ‘येणारी २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक असलेल्या मराठा सैन्याचा पराभव झाला. या पराभवामुळे देशाला पुढील २०० वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. या काळात देश बराच पिछाडीवर पडला. २०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे. सध्या १६ राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदिनिशी उतरणार आहे. त्यामुळे जनतेनेही नरेंद्र मोदी आणि भाजपला पुन्हा सत्तेत आणावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी देशातील जनतेला केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अमित शहा उपस्थितांना संबोधित करत होते.

You might also like
Comments
Loading...