मराठा आरक्षणावर आज दिल्लीत खलबत अमित शहा देखील राहणार उपस्थित

amit-shah

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मराठा आंदोलकांनी आतापर्यंत ५७ मुख मोर्चे काढले. तरीही सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळे ठोक मोर्चाला परळी येथून सुरुवात झाली. यातून गल्ली ते दिल्ली हादरली. अनेक मराठा समाज बांधवांनी आपले प्राण या आरक्षणासाठी दिले. त्याचबरोबर खासदार, आमदार, मंत्री सर्वांच्या घर आणि कार्यालयांसमोर ठिया आंदोलन सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारची नाचक्की सुरू आहे. यातून राज्य सरकारची झोप उडाली.

दरम्यान यामुळे राज्यात बिघडत चाललेली परिस्थिती, भाजप सरकारवर होणारी टीका ही आगामी लोकसभेला न परवडणारी आहे, हे स्पष्ट दिसत असल्यानं अमित शहा यांनी आज संध्याकाळी भाजपच्या खासदारांची विशेष बैठक बोलवली असल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक नवी दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीसाठी उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारची नाचक्की सुरू आहे. येत्या निवडणुकांना सामोरे जायचे असल्यास ही परिस्थिती शांत होणं गरजेचं असल्यानं आता बैठकांचं सत्र सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध तोडग्यांचा विचार केला जाईल, मात्र त्याचसोबत मराठा समाजातील आंदोलकांची समजूत घालण्यास भाजपचे खासदार कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळेच अमित शहा खासदारांची शाळा घेतील अशी देखील चर्चा रंगली आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

 

भाजपमध्ये सोशल मिडियाच्या वापरावरून ‘वाॅर’