‘अमित शाह, आपण राजीनामा कधी देणार?’, नवाब मलिक यांचा सवाल

nawab malik

मुंबई : ‘पश्चिम बंगालची निवडणूक सुरू असताना अमित शाह दावा करत होते की आम्हाला दोनशेहून अधिक जागा मिळतील. निकाल पूर्णपणे उलटा आहे. निवडणूक कालावधीत जेव्हा बंगालमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाने सहा लोकांना मारण्याचं काम केलं.

ममता बॅनर्जींनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा अमित शाह म्हणत होते की, मी त्यांच्या मागण्यावर राजीनामा देणार नाही. जनतेने मागणी केली तर राजीनामा देईल. एवढा मोठा पराभव याचा अर्थ जनता तुम्हाला राजीनामा मागत आहे. अमित शाह राजीनामा कधी देणार हे देश जाणू इच्छित आहे’ असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममतांनी अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निकालानंतर आता देशभरातील विरोधकांकडून पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका होत आहे.

तसेच, ‘निवडणुकीत मोकळी सूट देण्यात आली, संपूर्ण देशात करोनाचा पसरण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे! आम्हाला वाटतं की, सर्वोच्च न्यायालायने याची देखील स्वतंत्र सुनावणी करावी’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या