अमित शाह यांनी घेतली भय्याजी जोशींची भेट ; राणेंच्या प्रवेशावर चर्चा ?

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. या भेटीवेळी झालेल्या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही .भेटीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी भय्याजी जोशी यांना गराडा घातला . त्यावेळी भय्याजी जोशी म्हणाले की , अमित शाह यांच्याशी आपली मैत्री आहे . त्यामुळे ते मला भेटण्यासाठी येत असतात .

अशा भेटीतील चर्चा वैयक्तिक असतात, चर्चेचा तपशील सार्वजनिक करता येत नाही असे सांगत भय्याजी जोशी यांनी सांगितले. नवी दिल्लीत रविवार , सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या पार्श्वभूमीवर शाह यांनी भय्याजींची भेट घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल संघाची भूमिका जाणून घेण्यासाठी ही चर्चा असल्याच बोलल जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस अगोदर शाह हेभय्याजींच्या भेटीस आले होते . ठाणे येथे झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी अमित शाह आले होते . त्यावेळीही ते भय्याजींच्या भेटीस गेले होते.