अमित शाह यांनी घेतली माधुरी दिक्षितची भेट

मुंबई : भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत आज अमित शाह यांनी माधुरी दिक्षित यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे उपस्थित होते.

मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यासह रतन टाटा, लता मंगेशकर, यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत.

‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमेअंतर्गत ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांना भाजपचं काम समजावून सांगत आहेत. तसेच भविष्यात भाजपला समर्थन देण्याची विनंती करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या मोहिमेअंतर्गत क्रिकेटर कपिल देव यांची देखील भेट घेतली होती.