fbpx

भाजप-सेना नव्याने संसार थाटण्यास सज्ज, शहा-ठाकरे भेटी दरम्यान होणार युतीची घोषणा ?

टीम महाराष्ट्र देशा : नाही होय नाही करत भाजप शिवसेना अखेर नव्याने संसार थाटण्यास सज्ज झाले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे आज युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मागील साडेचार बर्षे सत्तेमध्ये राहून देखील शिवसेना भाजपमध्ये बेबनाव पहायला मिळाला. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार कि नाही हा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये युती होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, युतीसाठी शिवसेनेकडून भाजपपुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व अटी भाजपकडून मान्य करण्यात आल्याच देखील कळतय.

काय आहेत युतीसाठी शिवसेनेच्या अटी

लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.

भाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.

विधानसभेसाठी दोन्ही पक्ष १४४ – १४४ जागा लढतील

शिवसेनेची युती भाजपशी आहे, ना कि त्यांच्या मित्रपक्षांशी

भाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल.