मातोश्रीवरील बैठकीपासून मुख्यमंत्री दूरच

uadhav thakare

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, आणि सध्या पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणले गेलेले सबंध या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती. मात्र या बैठकीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरच ठेवण्यात आलं.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन चर्चा झाली. बैठकीत मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाल्याचं कळतंय. मात्र, या बैठकीतून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. मातोश्रीवर दोन टप्पात ही बैठक पार पडली.पहिल्या टप्प्यात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे याच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत स्वतंत्र बैठक झाली.मात्र या दोन्ही बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते.