‘अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी चर्चा झालीचं होती’

sanjay raut

टीम महाराष्ट्र देशा : अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे, असे पुनरुच्चार शिवसेना खा. संजय राऊत यांनी काढले आहेतराष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी परंपरेनुसार राजीनामा दिला आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटत आहे. तसेच सत्ता वाटपाबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत ठरलं होत, असे राऊत म्हणाले.

दरम्यान राज्यात सत्ता संघर्षाचे सत्र अद्याप सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र शिवसेनेने चर्चा थांबवली आहे. तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतही आश्वासनदिल गेल नव्हत,असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या