घुसखोरांना बाहेर काढण्याची धमक फक्त मोदींमध्येच – अमित शहा

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी जो ‘आसाम करार’ केला, त्याच उद्देश नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता. करार राजीव गांधींनी केला, मात्र व्होट बँकेसाठी बांग्लादेशींंना बाहेर काढण्याची हिंमत काँग्रेस सरकार दाखवू शकले नाही. ती हिंमत मोदी सरकारमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी राज्यसभेत केले.

मात्र हे आरोप कॉंग्रेसने फेटाळून लावत कॉंग्रेस नेते घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर आले. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने, सभापतींनी अगोदर दहा मिनिटे व नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. आसाममधल्या ४0 लाख लोकांना भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सादर करता आलेला नाही. पण विरोधक मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करतात. माझा त्यांना सवाल आहे की आसामच्या मूळ नागरिकांना मानवाधिकाराचे हक्क नाहीत काय, असा सवाल अमित शहा यांनी यावेळी केला.

तीन वर्षाच्या अपयशी कारभारातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर– नवाब मलिक

मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार