भाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही -अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही, असा माकपला थेट इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारला पायउतार करण्यासाठी कंबर कसून उतरलेल्या भाजपाने आक्रमक प्रचारास सुरूवात केली आहे.

गेल्या आठवड्यात त्रिपुराच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्रिपुरातील नागरिकांनी ‘माणिक’ ऐवजी ‘हिरा’ स्वीकारावा असे आवाहन केले होते. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारला पायउतार करण्यासाठी कंबर कसून उतरलेल्या भाजपाने आक्रमक प्रचारास सुरूवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी थेट माकपला आव्हान दिले आहे.

काय म्हणाले अमित शहा

मतदारांना त्रिपुरात मतदानापासून रोखले जाते. मी संपूर्ण माकपला सांगू इच्छितो की यावेळी त्यांची लढत भाजपाबरोबर असून स्वत:ला सांभाळा. भाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही आम्हाला त्रिपुरातील हिंसाचाराचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण करायचे आहे. इथे स्टॅलिन आणि लेनिनची जयंती साजरी केली जाते. पण रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंदांची नाही. तुम्ही भाजपाला एकदा संधी देऊन पाहा. पाच वर्षांत आम्ही त्रिपुराला मॉडेल राज्य बनवू.आम्हाला येथील परिस्थिती बदलायची आहे. इथे लाल बंधूंचे सरकार आहे. कम्युनिस्टांचे सरकार आहे. येथील सरकारी नोकरदारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला.