‘सासुरवाडीला अमित शहांनी भरघोस मदत केली पाहिजे, केवळ हवेतून फेरफटका मारू नये’

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगलीला आलेला महापूर ओसरू लागताचं राजकीय टोलेबाजी सुरवात झाली आहे. खासकरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेचं धारेवर धरले आहे. आता तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे. त्यामुळे तरी त्यांनी जास्त मदत करावी फक्त हवाई पाहणी करू नये,असा टोला थोरातांनी लगावला आहे. मुंबई येथे कॉंग्रेसने आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी थोरात बोलत होते.

यावेळी थोरात म्हणाले की, पूराची परिस्थिती गंभीर आहे. आता पूर ओसरल्यानंतर संकटं मोठी आहेत. असं असलं तरी प्रशासन अद्याप गतीने काम करत नाही. यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. मोठं नुकसान झालं तिथं केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी. पाच हजार मदतीने काहीच होणार नाही. त्यांच पुर्नवसन होणे गरजेचं आहे. तसेच कोल्हापूर ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सासुरवाडी आहे. त्यामुळे त्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जास्त मदत केली पाहिजे. केवळ हवाई पाहणी करू नये, असा टोला थोरात यांनी यावेळी लगावला.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या