अमित शाह म्हणतात आम्ही विकास केला, तर पवार म्हणतात तुम्ही राज्याला कर्जबाजारी केलं

टीम महाराष्ट्र देशा : गेली 15 वर्ष राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शरद पवार यांनी काय केले असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगलीच्या सभेत उपस्थित केला. यावेळी अमित शहा यांनी गेल्या ५ वर्षात झालेली विकास काम आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 15 वर्षाच्या काळात झालेली काम समोर ठेवा आणि बघा कोणत्या सरकारच्या काळात जास्त काम झाली, असे आव्हान शहा यांनी पवारांना दिले. मात्र आज हिंगणघाटमधील सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत हीच ती वेळ आहे, असे म्हणत या सरकारला सत्तेपासून दूर करा असे आवाहन जनतेला केले.

भाजपा सरकारने राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. मात्र गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारने राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे. मात्र विकास कुठेही दिसत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.

आज राज्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात खड्डे मुक्त राज्य करण्याचा निर्धार अन्ही केला होता. मात्र आता खड्डे युक्त राज्य अशी स्थिती झाली आहे. अशीच स्थिती शेतकऱ्यांची देखील झाली आहे. विरोधात असताना कापसाला ७ हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षांत कपाशीला एकदाही ७ हजाराचा भाव दिला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतही तशीचं परिस्थिती आहे. कांद्याला चांगला भाव असतानाही या सरकारने निर्यात थांबवली. शिवाय बाहेरूनही कांदा आयात केला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली, असे म्हणत शरद पवारांनी भाजप सरकारचा चांगलाचं समाचार घेतला.

महत्वाच्या बातम्या