fbpx

…. त्याचवेळेस कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली – अमित शहा

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान यावरून राहुल गांधी यांनी कर्नाटक आमदारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर टीका केली. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आणि दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपामध्ये येण्यासाठी जनता दलाच्या (सेक्युलर) प्रत्येक आमदारासमोर 100 कोटी रूपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हंटलं

राहुल गांधींच्या या टीकेला अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. ‘ज्यावेळी काँग्रेस पक्षानं संधीसाधूपणा करुन जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली,’ अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ‘राहुल गांधींच्या पक्षानं कर्नाटकच्या कल्याणासाठी नव्हे, तर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जेडीएसला पाठिंबा दिला,’ असा प्रतिहल्लादेखील शाहांनी केला आहे.

2 Comments

Click here to post a comment