fbpx

शिवसेना आमच्यासोबत कायम राहिल; अमित शहानी शिवसेनेला गोंजारले

amit shaha vr udhav thakare

बंगळुरू: शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला सतत गोंजारण्याचं काम करत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि रावसाहेब दानवे यांनी शिवसेना-भाजप निवडणुका एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम आहे. ‘शिवसेना आमच्यासोबत कायम राहिल’ अस वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एका मुलाखतीत केल आहे.

शिवसेनाला गोंजारण्याचे काम आता केंद्रपातळीवर देखील सुरु झाले आहेत. “शिवसेना आणि भाजपा एकत्रित लोकसभा निवडणूक लढवतील टीडीपी स्वत:हून एनडीएबाहेर पडला. मात्र शिवसेना आमच्यासोबत कायम राहिल. आम्ही पुढील निवडणूक एकत्र लढवू”, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

अमित शहा म्हणाले, शिवसेना एनडीएमध्ये कायम राहिल, असं शाह यांनी म्हटलं. ‘टीडीपी स्वत:हून एनडीएबाहेर पडला. ओदिशात भाजपा आणि बीजेडीमध्ये थेट लढत होईल. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर हल्ले केले जात आहेत. स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरूय,’ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.