शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का ? अमित शाह म्हणाले….

thackeray-shah

नवी दिल्ली- राज्यात सध्या भाजप-शिवसेना या दोन पक्षात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा वारंवार दावा महाविकास आघाडीच्या सरकारकडून केला जात आहे. तर भाजप मात्र हा आरोप फेटाळून लावत आहे.

कधी राष्ट्रवादी भाजप तर कधी भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येवू शकतात का याची देखील खमंग चर्चा राजकीय अधून मधून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केले आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखती दरम्यान शिवसेना आणि अकाली दला सोबतच्या युतीवर त्यांनी हे भाष्य केले.

शाह म्हणाले,एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,असं शहा म्हणाले. शिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे प्रश्न शहांना विचारण्यात आले. त्यावर मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकांवर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करू शकतो?,असं शाह यांनी म्हटलं.

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते, असं शहा यांनी म्हटलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि शिवसेनेवर भाष्य केलं.

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहार यावर भाष्य केले आहे. ‘तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?’, असा बोचरा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर, ‘राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते’, असे शाह यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-