काँग्रेसच्या काळात युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला हे विसरलात का?

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसच्या काळात युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लाठीमार सहन करावा लागला हे विसरलात का? असा प्रश्न विचारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. बालाघाट या ठिकाणी अमित शाह यांची सभा झाली त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत तुम्ही कधी शेतात बैल जुंपले आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे असे दाखवत कायमच शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणतात. राहुल गांधींनी एकदा तरी शेतात बैल जुंपले आहेत का? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...