fbpx

बांगलादेशी घुसखोरच तृणमूलची वोटबँक – अमित शहा

amit-shah

कोलकाता :  बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची वोटबँक असल्याने त्यांना देशातून हद्दपार करण्यासाठी ममता बॅनर्जी आणि तृणमूल यांचा विरोध असल्याचा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. तसेच बांगलादेशी घुसखोराच्या मुद्द्यावर कॉंग्रेसही गप्प असल्याचं त्यांनी म्हंटलय.

पुढे बोलताना शहा म्हणाले की, पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलंयं ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमुळेच, आज तृणमूल काँग्रेसकडून भाजपविरोधात पोस्टरबाजी करण्यात येतीये. मात्र भाजपसाठी देश आधी आहे आणि व्होटबँक नंतर असं भावनिक आव्हान देखील त्यांनी केलं.

भाजपचा बंगालला विरोध नाही तर, ममता आणि त्यांच्या तृणमूलला विरोध आहे. आमच्या पक्षाची स्थापनाच शामाप्रसाद मुखर्जी यांनी केली मग भाजप बंगाल विरोधी कसा असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.

राज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक

… खरतर मीच मुख्यमंत्री असायला पाहिजे होतो – एकनाथ खडसे