अमित शहा घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तणाव टोकाला गेला असताना, आज भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गतच अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याचे सर्व प्रयत्न सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक वेळेस आम्ही शिवसेनेशी युती करण्यासाठी तयार असल्याचं म्हंटलं आहे. मात्र शिवसेना भाजपशी युती करण्यासाठी फारशी अनुकूल नसल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान अमितशहा यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...