आज अमित शहा घेणार माधुरी दीक्षितची भेट

मुंबई : भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानातर्गत मित्रपक्षांचे नेते आणि समाजातील मान्यवर लोकांना अमित शहांसह अन्य नेते भेटत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यासह रतन टाटा, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत. या अंतर्गत शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत.

‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमेअंतर्गत ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांना भाजपचं काम समजावून सांगत आहेत. तसेच भविष्यात भाजपला समर्थन देण्याची विनंती करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या मोहिमेअंतर्गत क्रिकेटर कपिल देव यांची देखील भेट घेतली होती.