अमित शाह उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार ?

उद्धव ठाकरेंना

टीम महाराष्ट्र देशा- स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेला आता भाजपने गोंजारायला सुरुवात केली आहे . याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाषणही केले आणि पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी शिवसेना सोबत असावी अशी इच्छा आहे असे म्हटले.त्यावरूनच २०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपा आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होऊन त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.