भाजपकडून माधुरी दीक्षितला राज्यसभेची आॅफर?

मुंबई : भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, याचाच एक भाग म्हणून, आता पक्षाकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत काल शाह यांनी माधुरी दिक्षित यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे उपस्थित होते.

दरम्यान या भेटीत माधुरीला संपर्क ते समर्थन अभियानाची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी माधुरीला भाजपकडून राज्यसभेची आॅफर देखील देण्यात आल्याचं वृत्त आहे. माधुरीच्या भेटीनंतर अमित शहांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. त्यानंतर लता मंगेशकर यांची भेट होणार होती. मात्र, लतादीदींच्या तब्येतीच्या कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही.

You might also like
Comments
Loading...