उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावरून अमित शाह राज्यपालांवर नाराज

koshyari-thackeray

नवी दिल्ली : मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते, असं शहा यांनी म्हटलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि शिवसेनेवर भाष्य केलं.

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहार यावर भाष्य केले आहे. ‘तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?’, असा बोचरा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर, ‘राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते’, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं, असं अमित शहा म्हणालेत.

राज्यपालांच्या पत्राबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने आता विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा सेक्युलर असण्याला इतका विरोध पाहाता, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर मोठी टीका झाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले हे पत्र मीडियात सुद्धा प्रसिद्ध केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

महत्वाच्या बातम्या-