काश्मीर हिंसाचार प्रकरणी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात अमित शहांनी घेतली महत्त्वाची बैठक

काश्मीर हिंसाचार प्रकरणी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात अमित शहांनी घेतली महत्त्वाची बैठक

amit shah

नवी-दिल्ली : सोमवारी(१८ ऑक्टो.)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांवर या सुरक्षा बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक उपस्थित होते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार देशातील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांसह विविध कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी असेही सांगितले की, नक्षल प्रभावित राज्यांमधील परिस्थिती आणि देशभरातील दहशतवादी प्रणालींच्या कारवायांवर प्रतिबंध कसा आणता येईल यावरही चर्चा झाली.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की,’अंतर्गत सुरक्षाविषयक विविध आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्याच्या मार्गांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, या बैठकीला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध राज्यांतील बहुतेक पोलीस महासंचालकांनी या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली. दुपारी ३ च्या सुमारास बैठक सुरू झाली आणि संध्याकाळी उशिरा समारोप झाला.’

महत्वाच्या बातम्या