fbpx

‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.यावरून कॉंग्रेसचे नेते बीके हरीप्रसाद यांनी शहांना झालेल्या आजारावर बोलताना त्यांनी खालच्या भाषेत परीक्रिया दिली आहे.शहांना डुकराचा हा आजार कर्नाटकच्या सरकारला हात लावण्याचा प्रयत्न केल्यामुळेच झाला असल्याचे बेताल वक्तव्य बीके हरीप्रसाद यांनी केले आहे.

“ कर्नाटक सरकारला हात लावायचा प्रयत्न केल्यास त्यांना शाप लागेल. त्यांनी हात लावण्याचा अधिक प्रयत्न केल्याने त्यांची तब्येत आणखी खराब होईल. आमच्या अध्यक्षांबद्दलही ते वाईट बोललेत.” अशा तिखट शब्दात हरीप्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली.त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. मात्र त्यांना त्यांच्या या वक्तव्याची अजिबात खंत वाटत नसल्याचेही हरिप्रसाद यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली.याठिकाणी भाजपच्या पारड्यात अधिक जागा असताना सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.भाजपने त्यासाठी बरीच धडपड केली मात्र त्यात यश आले नाही. कर्नाटकात आता लवकरच भाजप सत्ता स्थापनं करेल, अशा प्रकारच्या भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळेच कॉंग्रेस नेते बीके हरीप्रसाद यांनी टीका केली आहे.