काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात १५ वर्षे सरकार असताना पवारांनी काय केले ?

टीम महाराष्ट्र देशा;- काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात १५ वर्षे सरकार होते. या १५ वर्षांत राज्यासाठी काय केले हे शरद पवार यांनी सांगावे असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांना लगावला आहे. ते जत (जि. सांगली) येथे प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी शहा पुढे बोलताना म्हणाले, त्यांच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला त्यांनी रसातळाला आणले होते. त्यांच्या १५ वर्षांच्या तुलनेत ५ वर्षांच्या भाजप सरकारने मोठी कामगिरी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने राज्याला मोठा विकास निधी उपलब्ध करुन दिला. विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी पैसा कमी पडू दिला नाही.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातला मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तुम्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली.फडणवीसांसारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही जो दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे. रात्रीच्या एक वाजता देखील कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात, अशा शब्दांत शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

महत्वाच्या बातम्या