fbpx

जे वंदे मातरमसाठी वेळ देऊ शकत नाहीत ते देश काय सांभाळणार – अमित शहा

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला होता. दरम्यान यावरून पुन्हा एकदा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला आहे. ज्या व्यक्तीकडे वंदे मातरमवेळी उभे राहण्यासाठी वेळ नाही, ते या देशाचे भले करू शकत नसल्याचं, शाह यांनी म्हंटलं आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला होता. राहुल यांना वंदे मातरमसाठी उभे राहण्यासाठी सांगण्यात येत असताना, राहुल यांनी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा, असे म्हणताना व्हिडिओत दिसून आले होते. त्यावरून अमित शाह यांनी आज कर्नाटकातील नारगुंड येथील सभेत राहुल यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेसच्या जनसभेत राहुल गांधीनी मध्येच वंदे मातरम थांबवण्याचे चुकीचे काम केले आहे. जे वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभे राहू शकत नाहीत आणि ज्यांच्याकडे यासाठी वेळ नाही. ते या देशाचे भले करू शकणार नाहीत, अशी टीका शाह यांनी यावेळी केली.