fbpx

बेरोजगारांना आरोप करण्यापलीकडे काम नाही; शहांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. राफेल करारात यूपीएच्या राजवटीत ५२६ कोटी रुपये दर निश्चित करण्यात आला होता, तर एनडीएच्या राजवटीत हा दर १६७६ कोटी रुपये इतका कसा झाला? याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्र्यांनी द्याव अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.

दरम्यान राफेलच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसकडून भाजपवर होत असलेल्या टीकेचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चागलाचं समाचार घेतलाय.बेरोजगारांना आरोप करण्यापलीकडे दुसरं काम नाही. त्यांनी केलेल्या आरोपांची चिंता वाटत नाही असं म्हणत शहा यांनी काँग्रेसवर निशाण साधला ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांनी आधीच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यूपीएच्या काळापेक्षा एनडीएच्या काळात झालेल्या करारात विमानाच्या किंमती वाढल्या आहेत. आता तुम्हीचं ठरवा की बेरोजगारांच्या बोलण्याला महत्व द्यायचं की, संरक्षण मंत्र्यांच्या बोलण्याला महत्व द्यायचं.

पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात

सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक