पेगॅसस प्रकरणावरून होत असलेल्या टीकेवर अमित शाह यांनी केले भाष्य, म्हणाले…

अमित शाह

नवी दिल्ली : इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. यामध्ये भारत सरकारचाही समावेश असून भारतातील 40 पत्रकारांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा संशय आहे. पेगॅससच्या माध्यमातून गोपनीय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या मेसेजवरही नजर ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान,19 जुलैपासून सुरू असलेल्या संसदेच्या मान्सून अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान, पेगॅसिस मुद्द्यावर विरोधक सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावर एक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिक स्तरावर भारताला अपमानित करण्याला काही वर्गांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

दुसऱ्या बाजूला पेगॅसस सॉफ्टवेअरच्या मदतीने राजकीय नेते, पत्रकार आणि इतरांची हेरगिरी झाल्याचे दावे केंद्रीय आयटी मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सपशेलपणे फेटाळून लावले आहेत. देशातील कायदे पाहता बेकायदेशीर देखरेख शक्य नसल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पेगाससचे माध्यमातील रिपोर्ट हा योगायोग असू शकत नाही. या खळबळजनक दाव्यांत कोणताही पुरावा नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP