… अखेर अमित शाह महाराष्ट्रात येणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसंच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध असल्याने चर्चा लांबणीवर पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोपर्यंत काँग्रेसकडून होकार येत नाही तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार नाही सांगितलं होतं. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान,आता राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस समवेत महाशिवआघाडीचे शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार दृष्टीपथात असताना शाह येत्या ४ डिसेंबरला महाराष्ट्रात येत आहेत. नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला शाह उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेसोबत कुरबुरी सुरु असताना केंद्रीय स्तरावरून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. विधानसभेचा तिढा सोडवण्यासाठी शाह आपली भूमिका पार पाडतील अशी अशा भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना होती. मात्र शाह एकदाही महाराष्ट्रात फिरकले नाहीत. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रात कार्यक्रम घेणेही टाळले होते. मात्र आता एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाह महाराष्ट्रात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या