अमित शहांनी बंगालमध्ये भाड्याने गुंड आणले : तृणमूल कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहयला मिळाला. तसेच शहा यांची रॅली सुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या भिरकावल्याने वातावरण तापले होते, यावेळी तुफान दगडफेकही करण्यात आली.

Loading...

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी झालेल्या प्रकरणाला तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले होते. मात्र, तृणमूल काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये कोणालाही मिरवणूक किंवा रोड शो करण्याचा अधिकार आहे. मात्र, या सगळ्यात बाहेरील लोकांचे काय काम? अमित शहा यांनी त्यांच्यासोबत तेजिंदर बग्गा या व्यक्तीला का आणले होते? दिल्लीत कोणाच्यातरी कानशिलात लगावल्याप्रकरणी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. अमित शहा बाहेरून अशा भाडोत्री गुंडांना घेऊन आल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी केला.

दरम्यान, भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी अमितजी यांची हत्या करण्यासाठी बांगलादेशी मारेकऱ्यांना खास बोलावून घेण्यात आले होते असा गंभीर आरोप केला होता तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तृणमूल कॉंग्रेसवर टीका केली होती.Loading…


Loading…

Loading...