संघ-भाजप कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून तुरुंगात डांबू – अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा- ‘काँग्रेसच्या काळात राज्यात दोन डझनहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात आलेलं नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून तुरुंगात डांबू अशा शब्दात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला आहे. कर्नाटक मध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे.

Loading...

काय म्हणाले अमित शहा ?

‘राजकारणात हिंसेला कोणताच थारा नाही. हिंसेद्वारे भाजपच्या विचारधारेला रोखता येईल असं काँग्रेसला वाटत असेल तर ती त्यांची घोडचूक आहे.राज्यात २४ भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यापैकी २२ जणांच्या हत्येची कार्यपद्धती एकसारखीच आहे. तरीही पोलिसांनी गंभीरपणे कारवाई केली नाही. उलट या मारेकऱ्यांना मोकळं सोडलं जातंय. पण भाजपचं सरकार येताच त्यांना पाताळातून शोधून काढू आणि तुरुंगात डांबू’.Loading…


Loading…

Loading...