‘विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार’

टीम महाराष्ट्र देशा- कोलकात्यात झालेल्या विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत. असे हे २०-२५ नेते एका व्यासपीठावर येऊन काहीही होणार नाही. नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून, पुन्हा तेच पंतप्रधान बनतील,’ अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला.

पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका मेळाव्यात शहा यांनी राज्यातील  तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. लोकसभेच्या आगामी निवडणुका राज्यात लोकशाही स्थापित करण्यासाठी असतील, असेही ते म्हणाले.नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व बंगाली निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येईल असे आश्वासनही या वेळी शहा यांनी दिले. तृणमूल सरकारने निर्वासितांसाठी काहीही केले नाही, मात्र आम्ही त्यांना नागरिकत्व देऊ, असेही ते म्हणाले.