‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल 

टीम महाराष्ट्र देशा – ज्यांच्या मनात चोरी असते तेच चौकीदाराला चोर ठरवण्याचा प्रयत्न करतात,  चार चोर एकत्र येऊन चौकीदाराला चोर ठरवू शकत नाही, चौकीदाराची भीती वाटू लागल्यानेच असे आरोप केले गेले, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींकडून देशासह सैन्याचीही दिशाभूल झाली असल्याचा आरोप शाह यांनी केला.

राफेल करारावर सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही हरकत घेण्यास नकार देत सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरले असून त्यांनी आरोपांचे स्त्रोत समोर आणावे आणि आपली विश्वासार्हता वाढवावी अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. कृपया बालिशपणे आरोप करणे सोडून राहुल गांधीनी आता आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही शहा म्हणाले.

काँग्रेस पक्ष एक काल्पनिक जगात जगणारा पक्ष काँग्रेस पक्ष एक काल्पनिक जगात जगणारा पक्ष आहे.  ज्यामध्ये सत्य आणि न्यायाला जागाच नाही. प्रश्न काँग्रेस पक्ष निर्माण करणार, वकीलही तेच आणि न्यायाधीश देखील तेच आहेत असं शाह यांनी म्हटलं आहे.

जे चोर असतात तेच चौकीदार चोर असल्याची बोंब मारतात नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकतेवर कुणाचीही शंका नाही. चौकीदार चोर नाही, जे चोर असतात तेच चौकीदार चोर असल्याची बोंब मारतात. चौकीदारापासून भीती असल्यानेच चोरीचे आरोप केले जात आहेत. मात्र कितीही आरोप करा सूर्याच्या तेजाला फरक पडत नाही, अशा शब्दात शाह यांनी कॉंग्रेसवर हल्लबोल केला.

You might also like
Comments
Loading...