‘जय श्रीराम’ पाकिस्तानात जावून म्हणायचे काय ? अमित शहांचा ममतांना सवाल

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ‘जय श्रीराम’च्या मुद्द्यावरून टीका केली आहे. घटाल येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांना ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या.

याला उत्तर देत अमित शाह यांनी भारतात नाही मग पाकिस्तानात जावून जय श्रीराम म्हणायचे काय असा सवाल ममता बॅनर्जी यांना विचारला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.