अमित शहा आणि कपिल देव यांच्यात गुफ्तगू

 

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपात प्रवेश करणार म्हणून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी कपिल देव यांच्या घरी हजेरी लावल्यामुळे या चर्चेला वेग आला आहे.

अमित शहा यांनी शुक्रवारी कपिल देव यांच्या  घरी जाऊन भेट घेतली. शाहांनी भेट का घेतली ? हे अजून गुलदस्त्यात आहे. पण भाजपचे चाणक्य असलेले शहा आता कोणती नवीन रणनीती आखाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान , भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता नाकारली आहे.