Share

Amit Shah । “केजरीवाल सरकार जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना फसवतंय”; अमित शहांचे आरोप

Amit Shah | नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत वेस्ट टू एनर्जी ( waste to energy) प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी दिल्ली सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशातील नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध आहे तर आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीला आपनिर्भर बनवले, अशी टीका अमित शहा यांनी केली.

अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) सरकार मोठमोठ्या आणि करोडो रुपयांच्या जाहिराती देऊन दिल्लीकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय. अमित शहा म्हणाले, ‘दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल दररोज प्रेस स्टेटमेंट देतात आणि मोठ्या जाहिराती प्रसिद्ध करतात. पत्रकारांच्या मुलाखतींनी विकास होईल आणि जाहिराती प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल होईल, असे त्यांना वाटते. तुम्हाला दिल्ली ‘आपनिर्भर’ बनवायची आहे, तर आम्हाला दिल्ली ‘आत्मनिर्भर’ करायची आहे.

अमित शाह (Amit Shah) यांनी वेस्ट टू एनर्जी प्लांटच्या उद्घाटनानंतर सांगितले की, काही लोक म्हणतात की निवडणुकांमुळे त्याचे उद्घाटन होत आहे, पण त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे कि, दिल्ली कचरामुक्त करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. ते म्हणाले की हा प्लांट दररोज सुमारे 2000 मेट्रिक टन कचरा हाताळेल, ज्यातून 25 मेगावॅट हरित ऊर्जा या संयंत्राद्वारे निर्माण केली जाईल.

जाहिरातींचे राजकारण हवे की विकासाचे?

अमित शहा (Amit Shah) म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या MCD सोबतच्या वागणुकीला आम्ही लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ. मला विश्वास आहे की आम्ही एमसीडीच्या मदतीने 2025 पर्यंत दिल्लीत दैनंदिन कचरा प्रक्रिया सुविधा उभारू. असे कचऱ्याचे ढीग आणि डोंगर भविष्यात दिसणार नाहीत असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ते पुढे म्हणाले की, दिल्लीतील जनतेने ठरवायचे आहे की त्यांना जाहिरातीचे राजकारण आवडते की विकासाचे राजकारण आवडते.
महत्वाच्या बातम्या :

Amit Shah | नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत वेस्ट टू एनर्जी ( waste to energy) …

पुढे वाचा

India Marathi News Politics