कोरोनाची बाधा झाल्यानंतर अमित मिश्रा रुग्णालयात दाखल; दिल्ली कॅपीटल्सने केले ट्विट

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

या दरम्यान मंगळवारी ४ मे रोजी दिल्ली कॅपीटल्सचा खेळाडू अमित मिश्राच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. अमित मिश्राला पुढील चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपीटल्सने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये लिहीले आहे की, ‘दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला रुग्णालायात दाखल केले आहे.त्याला बीसीसीआय आणि आयपीएलच्या नियमानुसार संपुर्ण वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल.’

दिल्ली कॅपीटल्सने या ट्विटमध्ये पुढे लिहीले आहे की, दिल्ली कॅपीटल्सचे वैद्यकीय पथकही त्याच्या संपर्कात असुन त्याच्या सुरक्षितेतबाबत आम्ही पुरेपुर काळजी घेत आहोत. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मागील दोन दिवसात आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या