‘काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘मायलेकांची गुलामीच’ करत राहणार’

टीम महाराष्ट्र देशा– काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत न झाल्यानं सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तसंच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं.

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सात सेकंदांच्या या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘मायलेकांची गुलामीच’ करत राहणार अशी अप्रत्यक्ष टीका करणारा व्हिडिओ मालवीय यांनी पोस्ट केला आहे.