अतिवृष्टीग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी अमित देशमुख दोन दिवसीय दौऱ्यावर

amit deshmukh

लातूर- राज्यात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, शेतकऱ्यांना भेटण्यासाठीअनेक दिग्गज नेते दौरा करत आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख दि. १८ ते १९ आँक्टोंबर दरम्यान दोन दिवसाच्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या काळात ते अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकरी वर्गाशी संवाद साधून दिलासा देतील.

अतिवृष्टी आणी परिणामी नदयांना आलेल्या पूरामुळे लातूर व ऊस्मानाबाद जिल्हयाच्या काही भागात खरीप पिकांचे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे रवीवार व सोमवार दोन दिवस लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना दिलासा देतील.

दरम्यान,राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह राज्याती अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी व पुरामुळे उभी पीके वाया गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दि. १८ ऑक्टोबर पासून या भागाचा पाहणी दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-